“महालक्ष्मी’ समुपदेशन केंद्रासाठी मदत करू : वनिता गोरे

सातारा : समुपदेशन केंद्रात आयोजित कार्यक्रमा प्रसंगी वनिता गोरे माजी जि. प. सदस्या शोभना गुदगे जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे.

मायणी, दि. 9 (प्रतिनिधी) – कुटुंबातील मारहाण लैंगिक छळ व इतर समस्यांनी त्रस्त तसेच मानसिक दृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी महालक्ष्मी महिला मंडळ मायणी व जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचे कार्य प्रभावीपणे सुरू असून केंद्राला महिला बालकल्याण विभागाच्या सादिलमधून निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन सातारा जि.प.च्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे यांनी केले.
जिल्हा परिषदेमध्ये महिला समुपदेशन केंद्रात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी जि. प. सदस्या शोभना गुदगे, समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा प्रतिभा माळी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे, सुषमा मोरे ,साळुंखे यांची उपस्थिती होती.
या केंद्रातून महिन्याला 30-35 कौटुंबिक वादाची प्रकरणे दाखल होतात. योग्य समुपदेशन व कायदेशीर सल्ला देऊन बहुतांश प्रकरणाचा निपटारा केला जातोय. या केंद्राला 17 वर्षे झाले असून आज अखेर हजारो कौटुंबिक वादाची प्रकरणे या केंद्राच्या सल्ल्याने मार्गी लागली असून अनेकांचे तुटू पाहणारे संसार सावरले गेलेत.
सुरेंद्र गुदगे म्हणाले, महालक्ष्मी मंडळाने समाजप्रबोधनाच्या कार्याची व्याप्ती वाढवावी. बाल्यावस्थेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार रुजवण्याची समाजाला गरज असून स्त्रियांप्रती आदराची भावना वाढवण्यासाठी समाजातून सर्वच स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे.
समुपदेशन केंद्रामुळेच आमचे संसार सुखाने पुनश्‍च सुरू झाल्याचे मनोगत लाभार्थी महिलांनी केले. ऍड. बर्गे यांनी प्रास्ताविक केले. सुषमा मोरे यांनी स्वागत केले. ऍड. स्मिता पवार यांनी आभार मानले.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)