महालक्ष्मी मंदिर परिसरात 80 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता

कोल्हापूर – कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. या  विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृहात झालेल्या या  शिखर समितीच्या बैठकीला  महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गृह राज्यमंत्री  दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडीक, राजेश क्षीरसागर,माजी मंत्री आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती येवलुजे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  मुख्यमंत्री म्हणाले की, बिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्त निवासामध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. तसेच मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहिल. तसेच मंदिरा निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी.  तसेच विकास आराखड्यातील कामांवर संनियंत्रणासाठी पालकमंत्री . चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी अशा सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)