महाराष्ट्र विकासकांना दिलासा

मंदीचा सामना करणाऱ्या विकसकांची स्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निवासी आणि व्यापारी या दोन्ही प्रकारच्या प्रकल्पातील फंजिबल आणि प्रिमियम एफएसआयवर येणारा खर्च कमी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्र सुस्त आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या सारख्या महानगरातील जमिनीचे वाढलेले भाव आणि मागणीत झालेली घट पाहता रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे मंडळी अडचणीत सापडले. परवडणाऱ्या घराच्या योजनेमुळे काही अंशी दिलासा मिळाला असला तरी संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन-तीन वर्ष हाताळणे विकसकाच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. रेरा कायदा, जीएसटीमुळे रिअल इस्टेटमधील सावळा गोंधळ थांबल्याने विकसकांना पारदर्शी कारभाराशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून आता लहान घरांना प्राधान्य देऊन ते बाजारातील पैसा काढण्याच्या तयारीत आहे. याकामी सरकारने धोरणात बदल केला आहे. स्वस्त घराचा एरिया किमान 300 चौरस फूट करण्यासाठी देखील अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-

घरातील भिंती, रस्त्याचे रुंदीकरणाच्या नियमात देखील शिथिलता आणली आहे. बिल्डरला निवासी प्रकल्पासाठी फंजिबल एफएसआय आता 60 टक्‍क्‍यांऐवजी 50 टक्के आणि प्रीमियम एफएसआयमध्ये कपात करून रेडी रेकनरचा रेट 50 टक्के आधारावर निश्‍चित केला जाईल. व्यापारी इमारतीसाठी फंजिबल एफएसआयचा हप्ता 80 टक्‍क्‍यांपासून 60 टक्के तर प्रीमियम एफएसआयमध्ये देखील कपात करून 50 टक्के केला.

व्यापारी संकुलातील कार्यालयात आत भिंत तयार करून संपूर्ण भिंतीपर्यंत कॅबिन तयार करता येऊ शकते. त्यामुळे व्यापारी इमारतींच्या निर्मितीत अडथळा येणार नाही. तसेच कोणत्याही सोसायटीपासून रस्त्याचा भाग जवळ असला तर आतापर्यंत एरियाएवढाच टीडीआर मिळत होता. परंतु नवीन बदलानुसार टीडीआर दुप्पट मिळणार आहे. यातून रस्त्याचे रुंदीकरण करणे सोपे जाईल. या नवीन सवलतीमुळे निर्मितीचा खर्च पाच ते सहा टक्‍क्‍यांपर्यंत घट होईल. आगामी काळात बिल्डर किंवा विकसक हे खर्चात झालेल्या बचतीचा लाभ ग्राहकांना देतील अशी अपेक्षा करू या.

– शैलेश धारकर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)