महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

1 हजार 224 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र : कटऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून 1 हजार 224 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा कटऑफ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आयोगामार्फत वनसेवा पूर्व परीक्षा दि. 24 जून 2018 रोजी घेण्यात आली होती. यातून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुदतीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य परीक्षा दि. 28 ऑक्‍टोबर 2018 रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. दरम्यान, आयोगामार्फत दि. 26 ऑगस्ट 2018 रोजी सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या संयुक्‍त पेपर क्रमांक एक या प्रश्‍नपत्रिकेच्या चारही संचांची प्रथम उत्तरतालिका (अन्सर कीज्‌) उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या उत्तरतालिकेवर काही हरकती असतील, त्यांनी दि. 17 सप्टेंबरपर्यंत आयोगाच्या पत्त्यावर अर्ज करावेत, असेही आयोगाने म्हटले आहे.

“अभियांत्रिकी’ पदांमध्ये वाढ
आयोगाने 137 पदांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली होती. त्यात सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, स्थापत्य, विद्युत या संवर्गासाठी ही पदे होती. ही परीक्षा सुरू असतानाच आयोगाने या पदांच्या संख्येत वाढ केल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. आता अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही 153 पदांसाठी होणार असल्याचे आयोगाचे उपसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)