महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश

कामगार मंत्र्यांची माहिती


वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना राबविण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करणार

मुंबई – राज्यातील 3 कोटी 65 हजार असंघटीत कामगारांसाठी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याऐवजी त्यांचाही यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी योजना राबविण्याकरिता सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यातील सुमारे 25 हजार अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते. वृत्तपत्र विक्रेता ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न करता भल्या पहाटे वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे कार्य करीत असतात. परंतु त्यांना मिळणारे तुटपुंजे कमिशन विषयी लक्षवेधी सुचना मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सुनिल राऊत, अशोक पाटील, प्रकाश फातर्पेकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी आदींनी सहभाग घेतला. या लक्षवेधी सुचनेला उत्तर देतांना कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्यात 3 कोटी 65 हजार असंघटीत कामगार आहे. या असंघटीत कामगारांना एका छताखाली आणण्यासाठी स्वतंत्र मंडळ गठीत केले जाणार आहे.

या मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश केला जाईल. या मंडळांतर्गत योजना राबविण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र राज्य सामाजिक कामगार सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.या मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश होणार आहे.

वृत्तपत्र विक्रेते ज्याठिकाणी व्यवसाय करतात त्याचठिकाणी त्यांना जागा देण्यासंदर्भात नेमण्यात येणाऱ्या सल्लागार समितीने केलेल्या सुचना शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येतील. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना लघुत्तम वेतन मिळावे व त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सेल निर्माण करणे तसेच कामाचे तास ठरविण्यासाठी कामगार विभागामार्फत आवश्‍यक कार्यवाही केली जाईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देतांना निलंगेकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी लागू केलेल्या जीवनदायी, भविष्यनिर्वाह निधी, वृध्दापकालीन पेन्शन, घरकुल, मुलांसाठी शैक्षणिक मदत याचाही लाभ दिला जाईल. वृत्तपत्र सल्लागार समिती स्थापन करून महानगरपालीका, नगरपालिका क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल उभारण्यासाठी गाळे, जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाकडे शिफारस केली जाईल, असे कामगार मंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)