महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर 

उपाध्यक्षपदी आबासाहेब पाटील 

लातूर: महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष म्हणून विजयप्रकाश दांडेगावकर यांची तर उपाध्यक्षपदी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्य साखर संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, श्रीराम शेटे, बबन शिंदे, गणपतराव तिडके, अरविंद गोरे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदींची उपस्थिती होती.
प्रतिकूल परस्थीतीतून वाटचाल करत असलेल्या साखर उद्योगास चालना देत साखर कारखानदारी समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा आत्मविश्‍वास साखर संघाचे नूतन उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून आबासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)