महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा जामखेड यांची कार्यकारणी जाहीर  

जामखेड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा जामखेड यांची अहमदनगर जिल्हाअध्यक्ष (दक्षिण) दत्तात्रय पाचपुते यांनी नुकतीच सदस्यांची बैठक घेऊन त्यात तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली आहे. संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून निवडीचे पत्र देऊन सर्वाचे अभिनंदन केले. 19 एप्रिल रोजी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, पत्रकार तुपे, जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, लियाकत शेख, ओंकार दळवी, शिवाजी इकडे, सुदाम वराट, निलेश वनारसे, सुनिल कासार आदी पत्रकार उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पाचपुते यांनी संघाची ध्येय धोरणे, पत्रकाराच्या  कर्तव्याबाबत चांगले मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश खंडागळे, जामखेड तालुका अध्यक्षपदी लियाकत शेख, तालुका उपाध्यक्षपदी दैनिक प्रभात तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी, सचिवपदी सुदाम वराट, सहसचिवपदी प्रेस फोटोग्राफर  सुनिल कासार, खजिनदारपदी मनोज कोळपकर, कार्याध्यक्षपदी निलेश वनारसे या प्रमाणे निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्ह्यात व तालुक्यात चांगले संघटन करण्याचे आवाहन करून, राज्यातील पत्रकारच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पत्रकार संघाला पाठबळ पुरवावे अशी सदिच्छा व्यक्त केली. संघाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे सोने करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)