महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बोर्डाच्या धर्तीवर संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. परिषदेने वर्षभरातील परीक्षांचे वेळापत्रक पहिल्यांदाच परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले असून, सर्व परीक्षांचे संभाव्य तारखा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आजपर्यंत परीक्षा जवळ आल्यानंतरच त्या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळत होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच परीक्षा परिषदेने 2017-18- या वर्षातील सर्व परीक्षांचे वेळापत्रक आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. राज्यातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून, यासंदर्भातील अधिसूचना 3 ऑक्‍टोबर रोजी काढण्यात येणार आहे.
या वेळापत्रकात ट्रेन्ड टिचर्स सर्टिफिकेट फॉर अँग्लो इंडियन स्कूल (टीटीसी परीक्षा), राष्ट्रीय इंडियन मिलेटरी कॉलेज परीक्षा, डीटीएड/डीएलईडी, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा व लघुलेखन परीक्षा, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. डीएलएड पुर्नपरीक्षेसंदर्भातील अधिसूचना 1 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून ही परीक्षा 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज परीक्षा 1 व 2 डिसेंबर रोजी होणार आहे. अर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 3 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत अधिक माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)