महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सागर पाटील

काळगाव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी सागर पाटील यांची निवड करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष रामनाथ जहाड व उत्तर महाराष्ट्र राज्य संघटक सचिन उपाध्ये यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामनाथ जहाड म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटना कार्यरत आहेत.

पत्रकारांचे अनेक प्रश्न व मागण्या आहेत. अन्य मागण्यांसाठी शासनदरबारी पत्रकारांचे असणारे पश्न व मागण्यांसाठी महाराष्ट्र पत्रकार संघ आज काम करत असून पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही दिली. सागर पाटील म्हणाले, गाव तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ स्थापन करून पत्रकाराचे असलेले प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घुटूकडे, कार्याध्यक्ष दादासाहेब पंढरीनाथ माने, सचिव नवनाथ खिलारे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)