महाराष्ट्र महिला हॉकी संघाची घोषणा

पुणे – आठव्या हॉकी इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नुकतीच महाराष्ट्र महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची धुरा कोल्हापूरच्या ऐश्‍वर्या चव्हाणकडे सोपविण्यात आली असून उपकर्णधार व गोलरक्षकाची दुहेरी भूमिका पुण्याची चैताली दुबेरकर सांभाळणार आहे.

रांची येथे दि. 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आठवी हॉकी इंडिया नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ‘ड’ गटातून खेळणार आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्राची सलामीची लढत 1 फेब्रुवारीला यजमान झारखंड विरुद्ध होणार आहे.

-Ads-

दरम्यान, छत्रपती स्पोटस्‌र्‌ कॉम्पलॅक्‍स येथे ऑलिम्पियन अजित लकरा आणि विक्रम पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महिला हॉकी संघाचे 7 दिवसीय सराव शिबिर झाले. या स्पर्धेत प्रशिक्षकपदी विलियम डिसूझा, तर व्यवस्थापक म्हणून नम्रता साहूजी जबाबदारी पार पाडणार आहेत.

महाराष्ट्र महिला हॉकी संघ – ऐश्‍वर्या चव्हाण (कर्णधार), चैताली दुबेरकर (गोलरक्षक, उपकर्णधार), ऐश्‍वर्या शिंदे, कविता विद्यार्थी, भावना खाडे, श्रद्धा तिवारी, प्रज्ञा भोसले, प्रगती बनेवार, अक्षता ढेकले, स्नेहल वाकसे, प्रियंका वाडमारे, पुजा शिंदे, अंकिता सपाटे, रुपाली सावंत, शिवानी बावडेकर, के. एम. रिता, वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)