महाराष्ट्र बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन 

पुणे: बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे 28 वे द्वैवार्षिक दोन दिवसीय अधिवेशन दिनांक 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. राजीव ताम्हणे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. देशभरातील सर्व बॅंकांमध्ये बहुमतात असणाऱ्या आणि बॅंकिंग उद्योगाला दिशा-दिग्दर्शन करणाऱ्या ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या या संघटनेने नागपूर येथील वर्धमान नगर येथे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजिले आहे.

ज्यामध्ये विजया बॅंकेचे माजी अध्यक्ष व्ही. कन्नन, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे माजी मुख्य सरव्यवस्थापक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॉ. एस. भरतकुमार, बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील माजी सरव्यवस्थापक पी. बी. अंभोरे मार्गदर्शन करतील.

वक्‍त्यांमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक ए. सी. राउत, एआयबीओएचे जनरल सेक्रेटरी कॉ. एस नागराजन आणि एआयबीईएचे सहसचिव कॉ. देवीदास तुळजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)