महाराष्ट्र प्रदूषण व नगरपंचायतची प्लास्टिक बंदीची धडक कारवाई

वडूज : जप्त केलेले प्लॅस्टिक समवेत अधिकारी शंकर केंदुळे, मुख्याधिकारी माधव खांडेकर व कर्मचारी वृंद.

नव्वद हजार रुपयेचा दंड वसूल
वडूज, दि. 30 (प्रतिनिधी) – वडूज येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नगरपंचायत यांनी अचानक केलेल्या प्लास्टिक बंदीच्या धाडसत्राने व दंडात्मक कारवाईने व्यापारी विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला. सातारा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर केंदुळे व मुख्याधिकारी माधव खांडेकर व कर्मचारी वृंद यांच्या संयुक्तरित्या ही धडक मोहिम पार पडली. या मोहिमेत नॉन ओव्हन पिशवी, बॅग्ज, थर्मोकोल पत्रावळी, ग्लास, डिश इ. प्लास्टिकयुक्त एकूण 1200 किलो साहित्य जप्त केले. तब्बल 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दुकानदार व व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. कारवाई पारदर्शक असल्याने कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे देखील अचानक धाडसत्र सुरुच राहणार आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)