‘महाराष्ट्र’ नव्हे, अपघातांचेच ‘राज्य’

रस्ते अपघातात 45 महिन्यांत 48 हजार बळी

पुणे – रस्ते अपघात आणि त्याबद्दल शासन आणि प्रशासनाची अनास्था यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. अपघात रोखण्यासाठी होणारे प्रयत्न किती अपुरे आहेत, याचाही उहापोह झाला आहे. त्यातून काही साध्य होत नसल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या 45 महिन्यांत रस्ते अपघातांत 48 हजार जणांचा बळी गेल्याची धक्‍कादायक कबुली राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: दिली आहे.

राज्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आठ आमदारांनी विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केले. यावर उत्तर देताना रावते यांनी ही माहिती दिली. 2015 ते 2018 या कालावधीत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडेल्यांची संख्या किती, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध करांच्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा निधी जमा केला जातो. गतवर्षी परिवहन विभागाकडे जमा झालेला 34 कोटींचा निधी विनावापर पडून परत गेला असल्याची बाब निदर्शनास आली आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला. रस्ता सुरक्षेसाठी नोंद झालेल्या वाहनांवर अधिभार लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून करावयाच्या खर्चाबाबत मान्यता देण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली असून 42 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आले आहे, अशी माहिती रावते यांनी दिली आहे.

त्याचबरोबर रस्त्यांवर टोल वसुली करूनही खड्डे भरत नसल्यासंदर्भात रावते म्हणाले, खड्ड्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असून न्यायालयाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये खड्ड्यांची माहिती नोंदविण्यासाठी जनतेस सुविधा उपलब्ध करणे व रस्ते दुरुस्तीची नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. रस्ते अपघातातील दोषींवर पोलीस विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

वर्ष – अपघाती मृत्यू


2015 – 13 हजार 292
2016 – 12 हजार 883
2017 – 12 हजार 264
2018 (सप्टेंबरपर्यंत) – 9 हजार 683
एकूण – 48 हजार 042


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)