महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यातील 384 शहरात 19.40 लाख घरांच्या बांधकामाला मिळणार गती

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत राज्यात सुरु असलेल्या घरकुलांच्या बांधकामांना गती मिळावी तसेच निश्‍चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी अलिकडेच मंत्रिमंडळाने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 384 शहरांमध्ये सुरु असलेल्या 19.40 लक्ष घरकुलांच्या बांधणीला गती येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस महामंडळाचे अध्यक्ष
या महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असुन गृहनिर्माण मंत्री अतिरिक्त अध्यक्ष आहेत. एक अशासकीय सदस्य सहअध्यक्ष असुन संचालक म्हणुन अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण), प्रधान सचिव(नवी-2) म्हाडाचे उपाध्यक्ष, झोपूचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवशाही पुर्नवसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक, सभापती नागपूर सुधार प्रन्यास, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, सिडकोचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अशासकीय सदस्य उद्योगक्षेत्रातील दोन तज्ज्ञ काम पाहणार आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील 384 शहरांमध्ये राबविण्यास केंद्र सरकाने मान्यता दिलेली असुन 2022 पर्यत 19.40 लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उदिष्ट निश्‍चित केलेले आहे. महामंडळासाठी म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण, शिवशाही पुर्नवसन प्रकल्प व अन्य इच्छुक शासकीय संस्थामार्फत प्रत्येकी 100 कोटी रुपयांची गुतंवणूक असणार आहे.
तसेच खुल्या बाजारातून भांडवल उभारण्याची, बॅंका आणि अन्य वित्तीय संस्थाकडून कर्जे उभारण्याची या महामंडळाला परवानगी असणार आहे. हे महामंडळ नोंदणी कायद्यांतर्गत कंपनी असणार असून या महामंडळाचे कामकाज हे नियोजन, विकास, वित्त व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत पार पाडले जाणार आहे. महामंडळाचे मुख्यालय नवी मुंबई असणार असून महामंडळाचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण महाराष्ट्र असणार आहे. या महामंडळाचा कालावधी 2022 पर्यत किंवा प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) सुरु असेपर्यत राहणार आहे.

गृहनिर्माण विकास महामंडळाला महाहाऊसिंगच्या मालकीच्या व महामंडळाशी सलग्न जमिनी, घरे आणि इमारतीचे संरक्षण व व्यवस्थापन करावे लागणार असून महामंडळाने ठरवून दिलेल्या उदिष्टांची पुर्तता करिता संसाधनाची उभारणी करुन योग्य संसाधनाचे वाटप करावे लागणार आहे. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी अभिनव प्रतिमान आणि तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन त्रिपक्षीय सल्लागारांच्या सहकार्याने घरांच्या गुणवत्तेची खातरजमा करावी लागणार आहे.

तसेच पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचे वितरण, योग्य आणि पारदर्शकपणे होत असल्याबाबत खात्री करणे, जलद आणि टिकाऊ परवडणाऱ्या घरांच्या उभारणीकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ही सर्व कामे जलद गतीनेआणि वेळेत पार पाडण्यासाठी आवश्‍यक निधीची उभारणी, या नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाला करावी लागणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)