हिंजवडी- महाराष्ट्र केसरी 2019 साठी मुळशी तालुका निवड चाचणी स्पर्धा आयटी व्हिलेज माण येथे रविवारी (दि. 25) आयोजित केली असल्याची माहिती पै. संदिप पारखी यांनी दिली. कुस्ती स्पर्धेच उद्घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते आमदार संग्राम थोपटे, कुस्ती परिषदेचे बाळासाहेब लांडगे, संदिप आप्पा भोंडवे, पुरुषोत्तम जाधव आणि शुक्राचार्य वांजळे, पांडुरंग ओझरकर, बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीत होत आहे. बक्षिस समारंभास माजी खासदार नानासाहेब नवले, आमदार महेश लांडगे, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी, हिंदकेसरी अमोल बराटे, मयूर कलाटे, शंकर मांडेकर, सचिन घोटकुले हे उपस्थित राहणार आहेत. विविध वजनी गटात होणाऱ्या स्पर्धा पाहण्यासाठी अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी मल्ल व प्रतिष्ठित तसेच राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात येणार असून विशेष कामगिरी करत यश मिळवणाऱ्या तालुक्यातील मल्लांचा सत्कारही केला जाणार आहे. तसेच निवेदक म्हणून प्रसिद्ध शंकर पुजारी हेदेखिल उपस्थित राहणार असल्याची माहिती मुळशी तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष मल्लसम्राट पै.शिवाजी तांगडे यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा