महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला नवी कोरी स्कार्पिओ कार भेट 

  • कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी दिली कार भेट
  • बाला ने मातीतल्या कुस्तीचा देशभर प्रचार करावा-सचिन सापळे

कोल्हापूर/सतेज औंधकर- मातीतल्या कुस्तीचा राज्यभर नव्हे तर प्रचार व्हावा म्हणून कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला नवी कोरी स्कारपीओ गाडी भेट दिली आहे. त्यामुळं आज पासूनसनाच बाला शेखने मातीतल्या कुस्तीचा प्रचार करान्याचा निश्चय केला आहे. बाला ने आजनपासून कुस्तीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

नवी कोरी स्कॉर्पिओ चालवणारा हा दुसरा तिसरा कोण नसून हा आहे महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख… ही नवी गाडी गावागावात घेऊन बाला निघालाय मातीतली कुस्तीचे धडे द्यायला. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून जगभर ओळखलं जातं. याच कुस्तीच्या पंढरीतून अनेक महाराष्ट्र केसरी , हिंदकेसरी असे मल्ल तयार झाले. यास मल्लांना हिंदकेसरी  गणपतराव आंदळकर यांच्यासह अनेक दिग्गज उस्तादांचा मार्गदर्शन लाभलं.  हीच मातीतली कुस्ती राज्यभर नव्हे तर देशभर जावी असा सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांचा उद्देश आहे.आजवर सापळे यांनी  पश्चिम महाराष्ट्रातील १२ मल्लांच पालकत्व  स्वीकारल असून  अनेक  अनाथ मुलं  त्यांनी  दत्तक घेतली आहेत. तसंच कोल्हापुरातील अनेक  शाळा  डिजिटल केले आहेत.सामाजिक कार्यकर्ते संतोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फौंडेशन च्या वतीनं गेली 25 वर्षे सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा सामाजिक वारसा असलेले  कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला आज स्कॉर्पिओ गाडी भेट दिली आहे .या गाडीतून बालाने देश  राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्ती चे धडे मल्लांना द्यावे अशी अपेक्षा सचिन साबळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच बाला ने हिंद केसरी आणि महाभारत केसरी स्पर्धा जिंकावी म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख याचं कुस्ती प्रशिक्षण कोल्हापुरात झालं. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाला केसरीने आपलय कुस्तीचे डावपेच खेळत आज तो महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बाळाची कोल्हापूरची असलेली नाळ आजही अतूट आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी आपणाला दिलेली स्कॉर्पिओ कार म्हणजे  कुस्तीचा फार मोठा मान आहे. म्हणूनच ही नवी गाडी घेऊन देशातील प्रत्येक गावात मातीतली कुस्ती टिकावी आणि वाढावी म्हणून मी प्रयत्न करीन महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख  म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फौंडेशन च्या वतीनं सुरू हे सामाजिक कार्यच सावत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाला सापळे कुठुमबीयांची मोलाची साथ आहे. या गाडी प्रदान कार्यक्रमाला पैलवान आणि सापळे कुठुमबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या गाडीतून मी गावोवावी जाऊन मी कुस्तीचे धडे मल्लांना देणार असून कुस्ती वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन- बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)