महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी सिकंदर शेख

राज्यभरातील 250 मल्लांचा सहभाग

लोणी काळभोर- सोलापूर येथील सिकंदर शेख यांनी पुणे येथील शैलेश शेळके याचा पराभव करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर 2019 हा खुल्या गटातील किताब मिळविला. 71 हजार रुपये रोख, चांदीची गदा व सुवर्णपदक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या वतीने राष्ट्रधर्म पूजक- दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा रामेश्‍वर (रूई) (जि. लातूर) येथे आयोजित केल्या होत्या. पुणे येथील शैलेश शेळके यांनी उपविजेतेपद मिळविले. अनिल जाधव (पुणे) याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राज्यभरातील एकूण 250 मल्लांनी भाग घेतला होता.

यावेळी हिंद केसरी दीनानाथ सिंग, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कुस्ती संघटक श्रीकांत देशमुख, रामेश्‍वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, विलास कथुरे, कार्यकारी संचालक रमेश कराड, डॉ. हनुमंत कराड, ह.भ. प. नारायण महाराज उत्तरेश्‍वर पिंप्रीकर, कमाल राज खॉं पटेल यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना सन्मानित करण्यात आले.

वजन गटातील विजेते पुढीलप्रमाणे ः वजन गट 86 किलो विक्रम शेटे (इचलकरंजी), अमोल मुंडे (पुणे), हेमचंद सांडुर (लातूर), सुहास घोडके (पुणे), 74 किलो दिनेश मोकाशी (पुणे), अमित सुळ (कुर्डवाडी) राकेश तांबुळकर (कोल्हापूर) आबासाहेब मदने (सोलापूर).70 किलो देवानंद पवार (रामेश्‍वर), अक्षय हिरगुडे(कोल्हापूर), अरूण खेगले (पुणे), तुषार जगताप (इचलकरंजी). 65 किलो- आबा अटकळे (पुणे), अक्षय गिराम (सोलापूर), आकाश अस्वले (कुर्डवाडी), गणेश लोमटे (रामेश्‍वर). 61 किलो- शिवराज हाके (रामेश्‍वर), दयानंद सलगर (बीड), संतोष हिरगुडे (कोल्हापूर), आदेश रायकर (अहमदनगर). 57 किलो- महेश तातपुरे (रामेश्‍वर), निनाद बडरे (सांगली), पंकज सलगर (सोलापूर), सूरज ढेरंगे (नगर). यावेळी 20 महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)