महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात “विद्यापीठ विद्यार्थी परिषदे’चे गठण

पुणे – नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन 2018-19 च्या विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रतिनिधी आणि अन्य सर्व जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी, तर विद्यार्थी परिषदेसाठी एक अध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन उपाध्यक्ष आणि दोन संयुक्‍त सचिव अशी कार्यकारी प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यापीठ विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत असल्याने विद्यापीठातर्फे सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्यांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी, शंका आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असा सल्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी यावेळी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थी परिषदेतून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीडचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा जामकर पद्मसिंग नारायण, अमरावतीचे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा बेकरिया अभिनंदन किशोर, शिरपूर येथील के. व्ही. टी. आर. आयुर्वेद कॉलेजचा चौधरी निखील राजेंद्र या तीन विद्यार्थी प्रतिनिधींची विद्यापीठ अधिसभेवर बिनविरोध निवड झाली.

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे आर. ए. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयाचे शिवराज काळे यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी कोहापूरचे कै. केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाचे पवनकुमार भोईर, नाशिकचे श्रीमती के. बी. आव्हाड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची तृप्ती जोशी यांची, तर सरचिटणीसपदी कोहापूरचे पी. एस. एम. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्च महाविद्यालयाचा सौरव मुळे यांची आणि संयुक्‍त सचिवपदी अहमदनगर येथील एस. एम. बी. टी. दंत महाविद्यालयाची सूर्यवंशी प्रेरणा आनंदा आणि मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाची गायत्री कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.

सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)