महाराष्ट्रात 47 टक्के बंद: दिपक केसरकर

गृह राज्यमंत्र्यांनी विरोधकांचा दावा खोडला

बंद शांततेत पाळल्याबद्दल मानले आभार

महाराष्ट्र 100 टक्के बंद झाल्याचा कॉंग्रेसचा दावा गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी खोडून काढला आहे. राज्यात केवळ 47 टक्के बंद झाल्याची माहिती केसरकर यांनी दिली. मात्र,विरोधकांनी पुकारलेला बंद शांततेत पाळल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे. बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून,या बंद दरम्यान कुठेही जबरदस्ती करण्यात आली नाही. यापूर्वी झालेल्या बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

मात्र आजचा बंद शांतेत पार पाडून विरोधकांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल गृहराज्यमंत्री केसरकर यांनी विरोधकांची स्तुती केली. पेट्रोल डिझेल दरवाढीतुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असून, यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच चांगला निर्णय होईल असे केसरकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)