नवी दिल्ली – “पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांत महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. या केंद्रांसह राज्यातील पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या 36 होणार आहे.

ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी आदी ठिकाणी सुरू केले जाणार आहे. गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्रात 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली आहेत. यामध्ये वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड,सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे.

या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे. बारामती येथे 4 सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहे. यानंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांस सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)