महाराष्ट्रात सुरु होणार १३ नवी पासपोर्ट सेवा केंद्र

नवी दिल्ली: येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने“पासपोर्ट आपल्या दारी” या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात ७ तर देशभरात १७३ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असून दुसऱ्या टप्प्याअखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ केंद्रांसह देशभरात २५१ पासपोर्ट सेवा केंद्रांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

ही असणार नवीन १३ पासपोर्ट सेवा केंद्र

‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत राज्यात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्र सुरु होणार आहेत. ही केंद्र सिंधुदुर्ग,लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई,डोंबिवली, पनवेल, नांदेड आणि जळगावचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)