मुंबई – केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2017 संबंधी जाहीर केलेली आकडेवारी विचारात घेता, महाराष्ट्रातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांसाठी योगदान वाढत आहे. आगामी काळातही यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. बजाज ऍलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने या वर्षी महाराष्ट्रात 16.90 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कंपनीने राबवलेले काही प्रमुख प्रकल्प शिक्षण, व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण, आरोग्यसेवा व पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांतील असून ते प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद व मुंबई येथे राबवण्यात आले. बजाज ऍलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ यांनी सांगितले, कॉर्पोरेट विश्वाचा एक भाग म्हणून आम्ही समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे, असे मला वाटते. प्रगतीला व विकासाला हातभार लावतील, अशा विषयांना पाठिंबा देऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)