महाराष्ट्रात महिला असुरक्षित -नीलम गोऱ्हे

  • कळस चोरीला वर्ष पूर्ण : कार्ला फाटा येथे एकवीरा देवीची महाआरती

लोणावळा – सर्वांची रक्षणकर्ती एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला बुधवार दि. 4 ला वर्ष पूर्ण झाले. पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीआयडी) तपास सोपवण्यात आला. मात्र अद्यापही चोर सापडले नाहीत. हीच स्थिती कायम राहिल्यास “आम्हा आया-भगिनी, माय-मावलींचे संरक्षण’ या महाराष्ट्रात कसे होणार? असा प्रश्‍न शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. वर्ष होऊनही या चोरीचा तपास न लागल्याने एकवीरा देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली भक्‍तांनी कार्ला फाटा येथे एकवीरा देवीची महाआरती करून आंदोलन केले.

यावेळी शिवसेना उपनेत्या नीलम गोरे यांनी तपास यंत्रणांना चांगलेच धारेवर धरले.ज्यांनी चोर लपवून ठेवले आहेत, त्यांच्यावर एकवीरा देवीची वक्रदृष्टी पडायच्या आत न्याय देवतेने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी हे अनोखे आंदोलन केल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला जाणे, हे लाखो भाविकांच्या श्रद्धेला धक्‍का असून कळस चोरी हे केवळ नाटक असून आपल्याला बदनाम करण्याचे हे षड्‌यंत्र आहे, असे अनंत तरे म्हणाले. चोर सापडले नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशाराही अनंत तरे यांनी दिला. आगरी, कोळी बांधव व भावीक आंदोलनाला उपस्थित होते. कार्ला फाटा येथे आंदोलनामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)