महाराष्ट्रात प्रथमच तंटामुक्ती अध्यक्षपदी महिला

मांडवगण फराटा- राज्यात दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानास सुरुवात झाली. तंटामुक्ती अभियानाचे आता हे दहावे वर्ष असून तंटामुक्ती यशस्वी करण्यासाठी गावोगावी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीच्या अध्यक्षपदापासून महिलांना दूरच ठेवण्यात आले होते.
तंटामुक्ती अभियानात महिलांचा सहभाग 30 टक्के असावा, असे शासनाचे आदेश असताना महिला कारभारणीला अध्यक्षपदापासून दूरच ठेवण्यात आले आहे. गावचा पोलीस पाटील तंटामुक्त समितीचा पदसिद्ध सचिव असतो. त्यामुळे येथे ही संधी कमीच आहे. यामुळे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात महिलांची उपस्थिती नगण्यच असते. जिल्हा प्रशासनाकडे जे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, त्यात एकाही समितीची अध्यक्ष महिला नसल्याचे आढळून आले आहे.
आंधळगाव(ता.शिरुर) येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रथमच महिला विराजमान झाली असून महाराष्ट्रातील तंटामुक्ती समितीच्या इतिहासातील महिला अध्यक्ष निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. आंधळगाव येथे दुसऱ्या सदस्याला संधी मिळावी म्हणून बाबू भीवा पांढरे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. याबाबत नवीन अध्यक्षाची निवड ग्रामसभेत होणार असल्याने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभा घेण्यात आली. दरवेळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेञात महिलांना स्थान दिले जात नाही. परंतु यावेळी महिलेला अध्यक्ष बनवायचेच गावाने ठरविले.
महाराष्ट्रातील प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान उज्वला राजेंद्र भोसले यांना मिळाला. या संधीचा उपयोग जनतेच्या वाद विवाद मिटवण्यासाठी केला जाईल, असे उज्वला भोसले यांनी सांगितले. यावेळी सरपंच नंदकुमार दाभाडे, उपसरपंच मुक्ताबाई दत्ताञय पोपळघट, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा बरकडे, कुसुम सरोदे,रतन सरोदे, भीमराव पांढरे, खंडू हंडाळ आदी उपस्थित होते.

  • तंटामुक्तीत महिलांचा सहभाग कागदावर
    महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावर पुरुष वरचढ असून महिलांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. काही ठिकाणी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरूनच गावात तंटे उभे राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तंटामुक्तीचा अध्यक्ष हा गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा; अथवा त्यांच्यावर कोणता गुन्हा अथवा भ्रष्टाचाराचे आरोप देखील नसावेत. महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी बऱ्याच कसरती कराव्या लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या तरी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानातील महिलांचा सहभाग कागदावरच आहे. परंतु शिरुर तालुक्‍यातील आंधळगावाने माञ इतिहास घडवत चक्क महिलेला अध्यक्ष पदाची संधी देत महिलाही या क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिले आहे.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)