महाराष्ट्रात उद्योगांसाठी वातावरण उत्तम 

उद्योग महासंघ : एक खिडकी योजनेमुळे उद्योगांचा पैसा आणि वेळेची बचत 
मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यात उद्योग करण्यासाठी सुलभ वातावरण तयार केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काम करीत असलेल्या कंपन्या आणि नव्या कंपन्याचा वेळ आणि पैसा वाचत असल्याचे उद्योग महासंघाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने नोंदणीसाठी सोपी अशी एक खिडकी योजना सुरू केली आहो. त्यामुळे कंपन्यांची नोंदणी कमालीची सोपी झाली असल्याचे दिसून येत आहे. अहवालात म्हटले आहे, की, सरकारने केलेल्या सुधारणामुळे उद्योगविषयक काम करण्याची प्रक्रीया सोपी आणि सुटसुटीत झाली आहे. नियमनही सोपे झाले आहे. त्याचबरोबर सरकारने कागदपत्राची संख्या कमी केली आहे. आवश्‍यक कागदपत्रे मिळण्यास वेळ कमी लागावा यासाठी चांगल्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याचे अभ्यास अहवालात म्हटले आहे.

सध्या उद्योग आणि भांडवल आकर्षित करण्यासाठी सर्वच राज्यात चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. ही चांगली बाब आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी वातावरण चांगले होते. ते आणखी चांगले करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या उद्योगाच्या नफ्यात वाढ होण्यास मदत होत असल्याचे या राज्यात काम करणाऱ्या उद्योगांनी सांगितले. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. या अगोदर उद्योग मंत्रालयाने उद्योग करण्यासाठी सोप्या असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली होती. त्यात महाराष्ट्र 10 व्या क्रमांकावर होता. आता नवी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या यादीत महाराष्ट्राचे स्थान सुधारले जाण्याची शक्‍यता असल्याचे उद्योग महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महासंघाच्या अहवालात टाटा केमिकलचे व्यवस्थापकीय संचालक आर मुकुंदन यांचा उल्लेख केला आहे. मुकुंदन यांनी सांगितले की, पर्यावरण विषयक परवानगी मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजकाचा वेळ वाचत आहे. इतर राज्यानीही अशी पद्धत विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात उद्योग करणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे नवे उद्योग सुरू होत आहेत.त्याचबरोबर महाराष्ट्रात नवी गुंतवणूक येण्यास चालना मिळत आहे. महाराष्ट्र सरकारच्या या धोरणामुळे राज्यात आगामी काळात तुलनेने अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
– संजय किर्लोस्कर, अध्यक्ष, किर्लोस्कर ब्रदर्स 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)