महाराष्ट्रातील 340 गावांचे होणार सर्वेक्षण

“स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ची घोषणा : गांधी जयंतीदिनी करणार सन्मानित
नवी दिल्ली – केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने आज “स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018′ ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणा-या राज्यांना तसेच जिल्ह्यांना 2 आक्‍टोबर या गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विभागाचे सचिव परमेश्ववरन अय्यर यांनी याची घोषणा केली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे संयुक्त सचिव अरूण बरोका आणि स्वच्छता पेयजल विभागाचे महासंचालक अक्षय राऊत उपस्थित होते.

“स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018’मध्ये देशभरातील सर्वच 698 जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्ह्यामधून 10 गावे याप्रमाणे 6 हजार 980 गांवाचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण 34 हजार 900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सरकारी शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत भवन, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल.

याअंतर्गत प्रत्येकी 3 ते 4 गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 7 ते 8 गावांमध्ये सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणा-या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)