महाराष्ट्रातील १८ पंचायत संस्थाना पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

नवी दिल्ली : ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  हा पुरस्कार मध्य प्रदेशातील मंडला येथे आयोजित पंचायतराज दिन कार्यक्रमात स्वीकारला. महाराष्ट्रातील 15 ग्रामपंचायती 2 तालुका पंचायत समिती व सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेस यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मध्य प्रदेशातील मंडला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचायतराज दिनानिमित्त दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार व नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला आदि उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)