महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १० हजार ६३९ घरे मंजूर

नवी दिल्ली – केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण ३ लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या ३२ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी ८६३ कोटींची गुंतवणूक आणि १५६ कोटींच्या सहाय्यासह १० हजार ६३९ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

राज्यातील पुणे शहर (पुणे), बार्शी (सोलापूर), कोल्हापूर शहर (कोल्हापूर), त्र्यंबकेश्वर (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर(नाशिक), जामनेर (अहमदनगर), बुलडाणा शहर (बुलडाणा), वरूड (अमरावती), अंमळनेर (जळगाव), चोपडा (जळगाव), मनमाड (नाशिक), लोहा (नांदेड), धर्माबाद(नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)