महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 10 हजार 639 घरे मंजूर

नवी दिल्ली – केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील 15 शहरातील गरिबांसाठी 10 हजार 639 घरे मंजूर करण्यात आली आहेत. देशात एकूण 3 लाख 21 हजार 567 घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या 32 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील 15 शहरातील गरिबांसाठी 863 कोटींची गुंतवणूक आणि 156 कोटींच्या सहाय्यासह 10 हजार 639 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

राज्यातील पुणे शहर (पुणे), बार्शी (सोलापूर), कोल्हापूर शहर (कोल्हापूर), त्रिंबक (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर (नाशिक), जामनेर (अहमदनगर), बुलडाणा शहर (बुलडाणा), वरूड (अमरावती), अंमळनेर (जळगाव), चोपडा (जळगाव), मनमाड (नाशिक), लोहा (नांदेड), धर्माबाद (नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष 2017-18 साठी एकूण 10 हजार 639 घरे मंजूर झाली आहेत.

या बैठकीत 18 हजार 203 कोटींची गुंतवणूक व 4 हजार 752 कोटींच्या सहाय्यासह देशभरातील 35 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांसाठी 3 लाख 21 हजार 567 घरे मंजूर करण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)