महाराष्ट्रातील ‘या’ क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास पोर्तुगाल तयार

मुंबई : पोर्तुगाल देशातील गुंतवणूकदार देखील महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती पोर्तुगालमधील एका शिष्टमंडळाने दिली.

या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुंबई येथे नुकतीच भेट घेतली. माहिती, तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन क्षेत्रात पोर्तुगालची कामगिरी उत्तम असून भारतासोबत या क्षेत्रात काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच ऊर्जा, रस्ते, रेल्वे, औषधनिर्माण आदी क्षेत्रात काम करण्याची तयारी असल्याचे तसेच स्थानिक कंपन्यांसोबत समन्वय ठेवून उद्योग विस्तार करण्याची तयारी असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्या जगभरात आपला विस्तार करण्यास इच्छुक असून त्यांना पोर्तुगालनेदेखील सहकार्य करावे, असे देसाई म्हणाले. राज्यात सध्या विविध प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून या क्षेत्रात पोर्तुगालने गुंतवणूक करावी, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे देसाई म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)