महाराष्ट्रातील मुळा-मुठा, कृष्णा होणार स्वच्छ

संग्रहित छायाचित्र

19 पथके स्थापन : पर्यावरण मंत्रालयाची स्वच्छता मोहीम
मुंबई – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील 19 राज्यातील 48 नद्या व समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिऱ्या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने 19 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा या नद्या, तर रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या व गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. 19 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 पथकने स्थापन केली आहेत.

यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरीष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल एजन्सी, राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्र किनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही यात सामवेश आहे.

ही पथके स्थानिक शाळेतील, महाविद्याल्यातील विद्यार्थ्यांना, स्थानिक समुहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी पर्यावरण विभागाने इको क्‍लब शाळेंचा सहभाग घेतला आहे. विभागाच्या वतीने राष्ट्रीय हरीत कॉर्प्स कार्यक्रमातंर्गत या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या नद्या, समुद्र किनारे, तलावांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये खर्च करण्यात येईल.
निवडण्यात आलेल्या स्थळांच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तुही स्वच्छ करण्यात येतील. ही मोहिम 15 मे पासून सुरू करण्यात आली असून ती 5 जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्न मंजुषा, वाद-विवाद स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.

या नद्यांची होणार स्वच्छता
मुळा-मुठा, कृष्णा (महाराष्ट्र), गोदावरी (आंध्र प्रदेश), मांडवी (गोवा), साबरमती, तापी (गुजरात), पेन्नारा, कावेरी (कर्नाटक), ब्रम्हपुत्रा (केरळ), नर्मदा (मध्यप्रदेश), महानदी (उडीसा), सतलज (पंजाब), राणी चु (सिक्कीम), वाई गयी (तामिळनाडु), मुसी (तेलगंणा), कानपूर गंगा, वाराणसी गंगा (उत्तरप्रदेश), गंगा (उत्तराखंड), गंगा (बिहार), बियास, सतलज (हिमाचल प्रदेश), हुगली (पश्‍चिम बंगाल), चंबळ कोटा (राजस्थान), घग्गर (हरीयाणा).

या समुद्र किनाऱ्यांची होणार स्वच्छता
मिऱ्या, गणपतीपुळे (महाराष्ट्र), मायपडु, पुलीकत तलाव, कोठा कोडुरू (आंध्रप्रदेश), कळंगुट, मिरामार, कोल्वा (गोवा), वेरावल, पोरबंदर, मंगरोल (गुजरात), पानाम्बुर, मालपे, गोकर्ण, कारवार (कर्नाटक), कन्नुर, कालीकत (केरळ), पुरी, पारादीप (उडीसा), पलवक्कम ,कन्याकुमारी, थिरुवोत्यूर /एन्नोर (तमिळनाडु), बाखली, ताजपूर (पश्‍चिम बंगाल).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)