महाराष्ट्रातील चार कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान 

नवी दिल्ली – प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चार कलाकारांसह देशभरातील 42 कलाकारांना वर्ष 2017चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1952 पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ललीत कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. 3 लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)