महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ उद्योगाने सुरक्षेची काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री

मुंबई- रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आपले राज्य प्रसिद्ध असून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत या पथविक्रेत्यांना आपण जागरूक करू शकलो, तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी सर्व्ह सेफ फूड या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. महाराष्ट्र अन्न व औषध मंडळ (एफडीए)व नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वर्डर्स ऑफ इंडिया (एनएएसव्हीआयशी भागीदारी करून नेस्ले इंडिया या कंपनीने हा प्रकल्प आयोजित केला आहे.

आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित अन्न, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट, व्यावसायिकता या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर रस्त्यांवर अन्नपदार्थ विकणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रभर मोबाइल व्हॅन फिरणार आहे. एफडीए महाराष्ट्राचे या प्रकल्पाला सहाय्य लाभले आहे. अन्नसुरक्षेसह राज्यभरातील रस्त्यांवर अन्नपदार्थ विकणाऱ्यांचे जीवनमान सुधारणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

-Ads-

मुख्यमंत्री म्हणाले की, ग्राहकांना आरोग्यपूर्ण अन्न मिळण्यासाठीच हा उपक्रम महत्त्वाचा नसून, पथविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही हा प्रकल्प अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सादर झाल्यापासूनच, सर्व्ह सेफ फूड या प्रकल्पांतर्गत यापूर्वी भारतातील रस्त्यांवर अन्नपदार्थ विकणाऱ्या 5 हजारहून अधिक विक्रेत्यांना फायदा झाला असून महाराष्ट्रातल्या 3600 विक्रेत्यांनी या प्रकल्पाचा फायदा करून घेतला आहे. एफडीएच्या आयुक्‍त डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या, आजच्या वातावरणात अन्न सुरक्षा आणि स्वच्छता हे खासकरून पथविक्रेत्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावतात, ज्यासाठी प्रशिक्षण हे सर्वाधिक महत्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)