महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

मुंबई : २५ मे रोजी दिल्लीमध्ये पार पडलेल्या केंद्रीय रुसाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या संस्थांना ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. संपूर्ण भारतामध्ये स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा फक्त तीन महाविद्यालयांना देण्यात येणार होता. यासाठी प्रत्येक महाविद्यालयासाठी ५५ कोटी रुपये अनुदान देण्याची योजना होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील फर्ग्युसन महाविद्यालय हे भारतातील पहिल्या तीन संस्थांमधील मानकरी ठरले आहे. ही बाब राज्यासाठी निश्चितच अभिमानस्पद आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून या आराखड्यामध्ये महाविद्यालयांची स्वायत्ता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन,अध्यापनाच्या पध्दतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या (रुसा) परिषदेच्या सभेमध्ये उपरोक्त घटकांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत रुसा महाराष्ट्राने तयार केलेले प्रस्ताव पारीत करण्यात आला. ‘रुसा’च्या दुसऱ्या टप्प्यात काही वैशिष्ट्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या आधी रुसा परिषदेतर्फे सर्व संस्थांच्या वतीने प्रस्ताव सादर केले जायचे, यंदा प्रथमच विद्यापीठे व महाविद्यालयांना स्पर्धेच्या स्वरूपात (चॅलेंजलेवल फंडीग) ऑनलाईन सहभाग नोंदवण्याची संधी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)