महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांमधील पाणी दूषित – अहवाल

मुंबई – महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांमधील पांणी दूषित असल्याचे आढळले आहे. सार्वजनिक प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालानुसार 30 जिल्ह्यांमधील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे प्रयोगशाळेत आढळून आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कूपनलिका, सार्वजनिक टॅंक, आणि ग्रामीण भागातील पाण्याचे टॅंकर यांमधून हे नमुने जमा करण्यात आले होते. यापैकी अनेक नमुन्यातील पाणे दूषित असल्याचे तपासणीत दिसून आले आहे.

राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी जमा करण्यात आले होते. त्यांची अनेक प्रयोगशाळांमधून तपासणी करण्यात आली.

-Ads-

वाशिम जिल्ह्यामध्ये दूषित पाण्याचे सर्वाधिक प्रमाण आढळून आले आहे. वाशिममधील 27 टक्के नमुने दूषित होते. त्याखालोखाल हिंगोली (24 टक्के नमुने दूषित पाण्याचे), आणि चंद्रपूर (21 टक्के नमुने दूषित पाण्याचे) यांचे क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहमदनगर, नांदेड आणि रायगड अशा जिल्ह्यांमधील 20 टक्के नमुने दूषित पाण्याचे असल्याचे आढळून आले, तर अकोला, बुलढाणा,यवतमाळ, जालना, गोंदिया, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 15 टक्के नमुने हे दूषित पाण्याचे असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर, भंडारा, ठाणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, परभणी, अमरावती आणि लातूर जिल्ह्यांतील 10 टक्के पाण्याचे नमुने दूसित असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नंदूरबार, वर्धा, गडचिरोली, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमधील 5 टक्के पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.

अधिक प्रमाणात दूषित असलेल्या पाण्यामुळे विविध आजार होण्याची शक्‍यता असल्याने काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे, अशी सावधगिरीची सूचना देण्यात अलेली आहे. स्वच्छ पाण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे उप संचालक डॉ. सुहास बाकरे यांनी सांगितले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)