महाराष्ट्राच्या महिलांचा सलग दुसरा विजय

पुणे – कर्णधार देविका वैद्य, सलामीवीर मुक्‍ता मगरे आणि आदिती गायकवाड यांनी पुन्हा एकदा निर्णायक कामगिरी बजावल्यामुळे महाराष्ट्राच्या महिला संघाला हरियाणाच्या महिला संघाचा 6 गडी राखून एकतर्फी पराभव करताना अखिल भारतीय स्तरावरील 23 वर्षांखालील महिलांसाठीच्या टी-20 सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करता आली.

मुंबईतील कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या हरियाणाच्या महिलांचा डाव महाराष्ट्राच्या महिलांनी निर्धारित 20 षटकांत 9 बाद 86 धावांवर रोखला. त्यानंतर 18.4 षटकांत 4 बाद 87 धावा फटकावताना महाराष्ट्राच्या महिलांनी विजयाची पूर्तता केली.

विजयासाठी 87 धावांच्या आव्हानासमोर मुक्‍ता मगरेने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 24 धावा, तर कर्णधार देविका वैद्यने केवळ 36 चेंडूंत 1 चौकारांसह नाबाद 25 धावा फटकावताना महाराष्ट्राला विजय मिळवून दिला. त्याआधी  हरियाणाकडून कर्णधार ओहलानने 20, शेफाली वर्माने 22, तर शिवांगीने 15 धावा केल्या. परंतु आदिती गायकवाडने 11 धावांत 3 बळी घेत हरियाणाची फलंदाजी उद्‌ध्वस्त केली. देविका वैद्य, उत्कर्षा पवार, माया सोनावणे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)