महाराष्ट्राच्या महिलांचा आसामवर एकतर्फी विजय

पुणे – कर्णधार देविका वैद्यची अष्टपैलू कामगिरी आणि सलामीवीर मुक्‍ता मगरे व आदिती गायकवाडची प्रभावी कामगिरी यामुळे महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामच्या महिला संघाचा 65 धावांनी दणदणीत पराभव करताना अखिल भारतीय स्तरावरील 23 वर्षांखालील महिलांसाठीच्या टी-20 सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबई येथे सुरू असलेली ही स्पर्धो 2 एप्रिलपर्यंत रंगणार आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राच्या महिलांनी निर्धारित 20 षटकांत 2 बाद 151 धावा फटकावल्या. त्यानंतर आसामचा डाव निर्धारित 20 षटकांत 9 बाद 86 धावांवर रोखून महाराष्ट्राने विजयाची पूर्तता केली. महाराष्ट्राकडून कर्णधार देविका वैद्यने केवळ 36 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 52 धावा फटकावतानाच केवळ 16 धावांत आसामचे तीन फलंदाजही परतवून विजयात मोलाचा वाटा उचलला.

मुक्‍ता मगरेने 46 चेंडूंत 7 चौकारांसह 54 धावा फटकावून देविकाला सुरेख साथ दिली. विजयासाठी 152 धावांच्या आव्हानासमोर आसामच्या फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. आदिती गायकवाडने 15 धावांत 3 बळी, तसेच तेजस हसबनीसने 22 धावांत 2 बळी घेत देविकाला साथ दिली. आसामकडून रेखाराणी बोराने सर्वाधिक 20 धावा केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)