महाराष्ट्राच्या महिलांचे देविका वैद्यकडे नेतृत्व

पुणे – मुंबई येथे खेळल्या जाणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील 23 वर्षांखालील महिलांसाठीच्या टी-20 सुपर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील महिला संघाचे नेतृत्व देविका वैद्य हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. येत्या 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ऍड. अभय आपटे यांनी आज जाहीर केला.

तेजल हसबनीसकडे या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रियांका घोडके व चेतेश्‍वनी राजपूत अशा दोन यष्टीरक्षक-फलंदाजांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील महिला संघाने चमकदार कामगिरी बजावताना गुजरात व सौराष्ट्र संघांचा पराभव केला होता. मुंबईने त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

महाराष्ट्राचा 23 वर्षांखालील महिला संघ- देविका वैद्य (कर्णधार), तेजल हसबनीस (उपकर्णधार), मुक्‍ता मगरे, माया सोनावणे, उत्कर्षा पवार, प्रियांका घोडके (यष्टीरक्षक), निकिता आगे, चार्मी गवई, शिवानी भुकटे, आदिती गायकवाड, श्रद्धा पोखरकर, वैष्णवी माशलकर, सुषमा पाटील, सायली लोणकर व चेतेश्‍वनी राजपूत (यष्टीरक्षक).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)