एमएसएलटीए योनेक्स सनराईज सुपर सिरीज् टेनिस स्पर्धा
पाचगणी: प्राप्ती पाटील हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवताना येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेच्या मुलींच्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या प्राप्ती पाटीलने ओरिसाच्या दुसऱ्या मानांकित सोहिनी मोहंतीचा 6-4, 6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. गुजरातच्या बिगरमानांकीत प्रियांका राणाने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित आस्मि आडकरचा 6-2, 0-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तर, अव्वल मानांकित तेलंगणाच्या इकराजू कनूमुरीने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित उर्वी काटेवर 6-1, 6-0 असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित उत्तरप्रदेशच्या सौमित्रा वर्माने सातव्या मानांकित महाराष्ट्राच्या जेनिका जैसनचे आव्हान 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले.
मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरने आपलाच राज्य सहकारी सहाव्या मानांकित समर्थ संहिताला 6-2, 6-1असे पराभूत केले. पाचव्या मानांकित तेलंगणाच्या चैत्रा गलीवेटी रेड्डीने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या व्रज गोहिलचा 6-4, 6-3असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात वेदांत भासीन व राघव अमीन यांनी रिशीक वाविलापल्ली व अथरिया हायग्रेवा यांचा 3-6, 6-2, 10-6असा तर, अर्णव पापरकर व व्रज गोहिल या जोडीने चिनार देशपांडे व समर्थ संहिता यांचा 6-1, 6-3असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सविस्तर निकाल:
उपांत्यपूर्व फेरी : 12वर्षाखालील मुले : महालिंगम खांडवेल (तामिळनाडू) (1) वि.वि. वेदांत भासीन (महा) (7) 6-2, 6-1, चैत्रा गलीवेटी रेड्डी (तेलंगणा) (5) वि.वि. व्रज गोहिल (गुजरात) 6-4, 6-3, श्री प्रणव तम्मा (कर्नाटक) (3) वि.वि. रूरिक रजीनी (कर्नाटक) (8) 6-1, 6-1, अर्णव पापरकर (महा) (2) वि.वि. समर्थ संहिता (महा) (6) 6-2, 6-1.
12 वर्षाखालील मुली : इकराजू कनूमुरी (तेलंगणा) (1) वि.वि. उर्वी काटे (महा) (6) 6-1, 6-0, प्रियांका राणा (गुजरात) वि.वि. आस्मि आडकर (महा) (5) 6-2, 0-6, 6-2, सौमित्रा वर्मा (उत्तरप्रदेश) (3) वि.वि. जेनिका जैसन (महा) (7) 6-1, 6-4, प्राप्ती पाटील (महा) (8) वि.वि. सोहिनी मोहंती (ओरिसा) (2) 6-4, 6-2.
दुहेरी : मुले: उपांत्यपूर्व फेरी : चैत्रा गलीवेटी रेड्डी/आदित्य राय वि.वि. महालिंगम खांडवेल/श्री प्रणव तम्मा 2-6, 6-3, 10-8, रूरिक रजीनी/क्रिश त्यागी वि.वि. आकांश सुब्रमणियन/अक्षज सुब्रमणियन 6-1, 6-1, वेदांत भासीन/राघव अमीन वि.वि. रिशीक वाविलापल्ली/अथरिया हायग्रेवा 3-6, 6-2, 10-6, अर्णव पापरकर/व्रज गोहिल वि.वि.चिनार देशपांडे/समर्थ संहिता 6-1, 6-3.
मुली: इकराजू कनूमुरी/सोहिनी मोहंती वि.वि. आकृती सोनकुसरे/ऐश्वर्या जाधव 6-1, 6-1, जेनिका जैसन/प्राप्ती पाटील वि.वि. देवांश्री प्रभुदेसाई/आर्या बोरकर 6-2, 6-1, श्रेया देशपांडे/आस्मि आडकर वि.वि. सिया प्रसादे/उर्वी काटे 6-3, 2-6, 10-7, वामिका शर्मा/सौमित्रा वर्मा वि.वि. थानिया गोगुलामांडा/जुई काळे 6-1, 2-6, 13-11.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा