महाराष्ट्राच्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे!

पिंपरी – महाराष्ट्र हा महापुरुषांचा, समाजाला दिशा देणाऱ्या समाज सुधारकांचा आहे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. त्यामुळे आपण या महाराष्ट्राच्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा विचारवंत अमरजीत पाटील यांनी केले.

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिंचवडमधील शाहूनगर येथील पिरॅमिड हॉलमध्ये मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमरजीत पाटील बोलत होते. पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, संघटक रमेश हांडे, पिंपरी महापलिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमरजीत पाटील म्हणाले की, शिवजयंती साजरी करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांना यायचे नसल्यास, नको येवू द्यात. आम्ही तिथे शिवजयंती साजरी करू. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. आज लग्न सोहळ्यात मावळ्यांची पगडी घालून स्वागताला उभे केले जाते. समारंभात जेवण वाढले. मावळ्यांचे हे होणारे विकृतीकरण थांबले पाहिजे. 30 वर्षे उलटली, तरी पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा बसवू शकले नाहीत. छत्रपती शाहू महाराजांचे कर्तृत्त्व घरोघरी पोहचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हा आणि तालुका जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवश्री डावखर (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशिक्षण), शिवश्री दहिभाते (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष उपक्रम), प्रमोद गोतारणे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशासन), विशाल जरे (पुणे जिल्हा सचिव), संजय वाजगे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, जुन्नर), विनायक सावंत (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मावळ), सोमनाथ गोडसे (पुणे जिल्हा संघटक), स्वप्नील तांबे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), शिवाजी बोत्रे (जिल्हा संघटक), अविनाश करंजे (जिल्हा संघटक), गणेश गारगोटे (खेड तालुकाध्यक्ष), निलेश कंधारे (मावळ तालुकाध्यक्ष), अजिनाथ मालपोटे (मावळ तालुका कार्याध्यक्ष), नामदेव पवार (जिल्हा संघटक जुन्नर तालुका), बापुसाहेब कांबळे (जिल्हा संघटक मावळ तालुका), संतोष सोनवणे (खेड तालुका संघटक) यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)