महाराष्ट्राचे स्टार’ पुरस्काराने सौंदणकर सन्मानित

पिंपरी- पनवेल येथील महाराष्ट्र चित्रपट महासंघ व साई सागर एंटरटेनमेंटच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्राचे स्टार” हा पुरस्कार महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांना प्रदान करण्यात आला. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यग्रह पनवेल येथे संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आयुक्त जमीर लेंग्रेकर,महाराष्ट्र चित्रपट महासंघाचे अध्यक्ष जनार्दन शिंदे आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तिींना प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात येते. सौंदणकर यांचे कार्य नव्या पिढीला दिशादर्शक असल्याचे मत आयुक्त जमीर लेंग्रेकर यांनी व्यक्‍त केले.
या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असल्याचे मत सौंदणकर यांनी व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)