महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच

उद्योगमंत्री सुभाष देसाई
कोल्हापूर – महाराष्ट्राचे 2018चे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यात आले आहे. यासाठी शिखर बैठक लवकरच घेऊन सर्वसमावेशक नवीन औद्योगिक धोरण लवकरच आणले जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनची विशेष बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सयाजी येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार व मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

महाराष्ट्राचे 2018 चे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यात येत आहे. यासाठी शिखर बैठक लवकरच मुंबईत घेवून उद्योगांना सहाय्यभूत ठरणारे प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे नवीन औद्योगिक धोरण अंतिम स्वरूप निश्‍चित केले जाईल. यामध्ये औद्योगिक निर्यातीला प्रोत्साहन, महाराष्ट्राचे औद्योगिक विकास महामंडळ जागतिक दर्जाचे बनविणे, राज्यातील औद्योगिक वसाहतींचे सौंदर्यीकरण, अतिक्रमणे हटविणे अशा सर्व गोष्टींचा समावेश करून सर्वकंष औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई स्पष्ट केले.

वीजदर वाढीबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे औद्योगिक वीजदर परवडणारे असावेत, ही शासनाची भूमीका आहे. यासाठी शासनस्तरावर निश्‍चितपणे पाठपुरवा केला जाईल. औद्योगिक वसाहतींमध्ये ईएसआय हॉस्पिटलसाठी एमआयडीसीच्या मार्फत तात्काळ भूखंड उपलब्ध करून दिला जाईल. तसेच औद्योगिक कामगारांसाठी उद्योग घटकांनी रूग्णालय चालवू शकतील, अशी यंत्रणा उभी करावी. त्यांना एमआयडीसीमार्फत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)