महाराष्ट्राची “राष्ट्रपती पोलीस पदकां’वर छाप

महाराष्ट्राला एकूण 44 पदके : उत्कृष्ट सेवेकरिता 4 पदके

नवी दिल्ली  –  पोलीस पदकांची आज घोषणा झाली महाराष्ट्रातील एकूण 44 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता “राष्ट्रपती पोलीस पदक’, तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 पोलिसांना “पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 855 पोलीस पदक जाहीर झाली असून तीन पोलिसांना मरणोत्तर “राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमजी), 146 पोलीसांना “पोलीस शौर्य पदक'(पीएमजी), 74 पोलीसांना उत्कृष्ट सेवा “राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस) आणि 632 पोलिसांना “पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 44 पदक मिळाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील 74 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिका-यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग (भ्रष्टाचार विरोधी ब्युरो, वरळी, मुंबई), सहाय्यक कमांडंट भास्कर एस. महाडिक (राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप 11,नवी मुंबई), सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश भालचंद्र जोशी (खेरवाडी विभाग, मुंबई) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णु जी. नागाळे (स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत.

उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्या देशातील एकूण 74 पोलीस अधिका-यांमध्ये केंद्रशासानाच्या सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील दोन अधिका-यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुंबई येथील कार्यालयातील सहाय्यक संचालक जीवन रमाकांत कुलकर्णी आणि केंद्रीय अन्वेशन ब्युरोच्या मुंबई कार्यालयातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत विठ्ठल पुजारी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)