महाराष्ट्राची ‘पैठणी’ राजधानीतील आजिविका मेळ्यात आकर्षणाचे केंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्राची ‘पैठणी’ सरस आजिविका मेळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरत असून राज्यातील अन्य दालनालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील एकूण १४ महिला बचत गटांचा समावेश या मेळ्यात आहे.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने येथील प्रगती मैदानात सरस आजिविका-२०१८ मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध राज्यातील हस्तकला, लघुउद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध दालने याठिकाणी मांडली आहेत. राज्यातील ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने येथे 14 दालने उभारण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्राचे पैठणी, कोल्हापूरी चप्पल, रत्नागिरीचा काजू, नाशिकचे मनुके, भटकी चित्रकला, यवतमाळचे सुखे मशरूम, बांबूच्या वस्तू, लाकडी सजावटीच्या वस्तू, कलात्मक रांगोळी, रत्न जडीत आभूषणे अशी वैविध्यपूर्ण चांदा ते बांदापर्यंतच्या 14 बचत गटांचा समावेश याठिकाणी आहे.आजिविका मेळ्यात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसातील आरजू बचतगटातर्फे लाकडी सजावटीच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या लाकडी वस्तू सागवानापासून बनलेल्या आहेत. याशिवाय या वस्तूंचे वेगवेगळे सुट्टे तुकडे करून त्या वस्तू लगेचच जोडताही येतात. या सजावटींच्या वस्तूंची किंमतही माफक असल्याचे बचत गटाच्या रेखा भगत यांनी माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)