महाराष्ट्राची कांची अडवाणी “मिस इंडिया’

नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची अडवाणीने अकराव्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला गटाचे सुवर्णपदक जिंकून “मिस इंडिया’ हा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची अडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला हादरा दिला. मूळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सोनेरी कामगिरी रचली.

हरयाणाची गीता सैनी तिसरी आली, तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस्‌ मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्‍चिम बंगालच्या सोनिया मित्राने रुपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)