महाराष्ट्राची अद्याप केरळला मदत नाही

मुंबई – दिल्ली या छोट्या राज्यासह देशातील विविध राज्य सरकारांनी पुरग्रस्त केरळ राज्याला आर्थिक मदत जाहीर केली असली तरी महाराष्ट्राने मात्र अद्याप कोणतीही मदत जाहीर न केल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या संबंधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की या शतकातील सर्वात मोठ्या पुरस्थितीशी केरळ हे राज्य झुंजत असताना महाराष्ट्र सरकारने त्यांना तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.

-Ads-

देशातील कोणत्याही भागात कोणतीही आपत्ती आली की महाराष्ट्र कायम तेथे मदतीसाठी धाऊन गेला आहे. याही वेळेला मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्राने केरळला भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. केरळची पूरआपत्ती ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अशीच मागणी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली असून महाराष्ट्राने खुल्या दिलाने केरळला मदत जाहींर करावी अशी सुचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)