महाराष्ट्रच्या सिद्धेश पांडे, रिगन अलबुक्‍युरेक्‍यु यांना सुवर्ण तर, मधुरिका पाटकरला रौप्यपदक

राष्ट्रीय रॅंकिंग पूर्व विभागीय टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

मुंबई: महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस पूर्व विभागीय राष्ट्रीय रॅंकिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.पुरुष एकेरी व मुलांच्या ज्युनियर गटात सिद्धेश पांडे व रिगन अलबुक्‍युरेक्‍यु यांनी सुवर्णपदक मिळवले.मधुरिका पाटकरने महिला एकेरीत रौप्यपदक मिळवले.

-Ads-

बिनमानांकित सिद्धेश पांडेने अमलराज अँथनी आणि ज्युनियर माजी जागतिक अव्वल मानांकित मानव ठक्कर यांना पराभूत केले.सिद्धेशने सीआरएसबीच्या सिवानंदा सेशाद्रीवर 4-0 तर, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (एएआय) रोनीत भांजाला 4-2 असे पराभूत केले.उपांत्यफेरीत त्याने अर्जुन घोष तर, अंतिम सामन्यात त्याने मानव ठक्कर 4-3 असे पराभूत केले.
मधुरिका पाटकरची सुरुवात आव्हानात्मक झाली. तिने पश्‍चिम बंगालच्या प्रेमांगी घोषला 4-2 अशा फरकाने नमविले.

 

पुढच्या सामन्यात ऐश्वर्या देबला 4-0 असे नमविल्यानंतर पुढच्या सामन्यात आरबीआयच्या अमृता पुष्पकने तिला आव्हान दिले. तिने यानंतर पश्‍चिम बंगालच्या सुरभी पटवारी व पीएसपीबीच्या रीथ रिश्‍याला नमवित तिने अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात पश्‍चिम बंगालच्या सुथीर्ता मूखर्जीने मधुरिकाला 4-0 असे नमविले. मुलांच्या ज्युनियर गटातील अंतिम सामन्यात रिगन अलबुक्‍युरेक्‍युने गुजरातच्या मनुष शाहला 4-2 असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)