महाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्थाची विजयी आगेकूच 

आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2018 

पुणे, दि. 15 -महाराणा मंचर, उत्कर्ष क्रीडा संस्था यांनी पुरूष विभागात तर राजमात जिजाऊ, जागृती प्रतिष्ठान या संघांनी महिला विभागातील आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना भोसरी येथील कै. प्रमोद कुलकर्णी क्रीडानगरीत भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित “आमदार चषक ‘ मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या साखळी सामन्यात विजय आगेकूच नोंदवली.

यावेळी झालेल्या पुरूष विभागातील पहिल्या सामन्यात मंचरच्या महाराण प्रताप संघाने राणा प्रताप पुणे संघावर 34-18 असा विजय मिळविला. मद्यंतराला 12-9 अशी आघाडी महाराणा संघाकडे होती. महाराणा प्रताप संघाच्या मेघनाथ निघोट याने चौफेर चढाया केल्या तर प्रथमेश निघोट याने चांगल्या पकडी घेतल्या. राणा प्रताप संघाच्या शैलेश सपकाळ व संकेत शेळके यांनी चांगला खेळ केला.

तर, शिवशक्ती घोडेगाव व आनंद स्पोर्टस्‌ ऍकॅडमी यांच्यात झालेल्या अत्यंत अटितटीचा सामना 22-22 अशा समान गुणांवर संपला. मध्यंतराला देखील दोन्ही संघ 11-11 असा समान गुणांवर होते. शिवशक्ती घोडेगावच्या सागर काळे रजत बोबडे यांनी चांगला खेळ केला. तर आनंद स्पोर्टस्‌च्या स्पनील गायकवाड व अविनाश चव्हाण यांनी चांगला खेळ करीत सामना बरोबरीत संपविण्यात मोलाचा वाटा उचलला.

महिला विभागात राज माता जिजाऊ संघाने द्रोणा स्पोर्टस्‌ संघावर 26-8 अलसा एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला राजमाता संघाकडे 23-4 अशी भक्क्‌म आघाडी होती. राजमाता जिजाऊ संघाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे यांनी चौफेर चढाया करीत मध्यंतरापुर्वीच आपल्या विजयावर शिक्का मोर्तब केले. त्यांना पायल घेवारे हिने उत्कृष्ठ पकडी घेत चांगली साथ दिली. द्रोणा स्पोर्टस्‌च्या ऋृतिका व्यवहारे हिने काहीसा प्रतिकार केला.

जागृती स्पोर्टस्‌ संघाने भोसरीच्या महेशदादा स्पोर्टस्‌ संघावर 17-15 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतरला जागृती संघ 7-8 असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर मात्र सायली होनमाने हिने केलेल्या खोलवर चढायांच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिला वर्षा यादव हिने पकडी घेत चांगली साथ दिली. महेशदादा स्पोर्टस्‌ फौडेशनच्या राधा मोरे हिने चढायांमध्ये व दिपाली काळजे हिने पकडी घेत चांगला खेळ केला. मात्र त्या आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.

महाराणा प्रताप पुणे व ब्रम्हा विष्णू महेश चिखली हा सामना 26-26 असा समान गुणांवर संपला., राकेशभाऊ घुले वि.वि. नु.म.वि. (36-22),
इतर झालेले सामने- धर्मवीर बालेवाडी संघ वि.वि. ओम साई (19-16), एम.एच. स्पोर्टस्‌ वि.वि. शिवप्रताप (30-17),
या वेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार शांताराम जाधव, स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोल फुगे व सुनिल लांडे, दशरथ लांडगे, पांडूरंग धावडे, दिपक धावडे व दत्ता माने, संदेश जाधव आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)