महामार्ग उड्डाणपुलाच्या भिंतीमध्ये चिमण्यांनी शोधला निवारा

कुरकुंभ – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुकादमवाडी परिसरात पक्षांनी विशेषतः चिमणीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना राहण्यासाठी निवारा म्हणून थेट सिमेंट कॉंक्रेटची तयार घरे मिळवली आहेत. इमारती, रस्ते, उड्डाणपूल, घरे, बंगले, गृहप्रकल्प तसेच वाढते शहरीकरण अशा विविध कामांसाठी जागोजागी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते. या वृक्षतोडीमुळे निरनिराळे पक्षी आणि त्यांचा विविध झाडांवरील हक्काचे निवारा (घरटी) उद्‌धवस्त होऊन त्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
कुरकुंभ परिसरातील मुकादमवाडी येथे एक उड्डाणपूल आहे. पुलाच्या खालील बाजूंच्या भिंतीना ठराविक अंतर सोडून अज्ञात कारणासाठी जागोजागी बिळे (होल) ठेवली आहेत. या बिळात पीव्हीसी पाईपचे तुकडे लावलेले आहेत. चिमण्यांनी या बिळांना आपला निवारा (घरटे) केले आहे. चिमण्यांनी बिळातील पाईपात गवत, काड्या, दोरा, कापूस, कपड्याचे बारीक तुकडे अशा विविध वस्तू गोळा करून घरट्याला आतील बाजूने सजविले आहे. ठराविक वेळाने बिळातून बाहेर येऊन चिवचिव आवाज करीत आहेत.
घरट्यातून बाहेर डोकावणाऱ्या चिमण्या, पिल्लांना पाहून त्यांना राहण्यासाठी खास अपार्टमेंटची सोय केल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र, चिमण्यांची पिल्ले पळवून नेण्यासाठी काही कावळे त्यांच्या घरट्यासमोर टपून बसलेले असतात. यामुळे येथील चिमण्या आपल्या घरट्यापासून दूर न जाता समोरील लाईटच्या तारांवर, काही झाडांच्या फांद्यावर बसून लक्ष ठेवत असल्याचे आढळतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)