महामार्गास विरोध करणाऱ्या 12 शेतकऱ्यांना अटक

25 शेतकऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल

लातूर – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यात वाढीव भूसंपादन न करताच होणाऱ्या लातूर-जहिराबाद या 752 के राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. याप्रकरणी 12 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जामीन घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्याने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महामार्गाचे काम अडवणाऱ्या 25 शेतकऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करत 12 शेतकऱ्यांना अटक केली. मात्र आता अटक केलेल्या शेतकऱ्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने या शेतकऱ्यांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-Ads-

सध्या लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे सुरु आहे. पहिल्या टप्यात निलंगा ते औराद शहाजानी रस्त्यावर गेली अनेक दिवसांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात आमची शेती अधिग्रहण न करता त्यावर रुंदीकरणाचे काम केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू असलेले काम बंद पाडले.

शेतकऱ्यांनी काम बंद पाडल्याने महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधीत कंपनीच्या प्रतिनीधीने औराद पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर 25 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करुन 12 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
111 :thumbsup: Thumbs up
36 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)